आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीतिका छेडछाडप्रकरणी \'जॉली LLB\'चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'जॉली LLB' या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांना अभ‍िनेत्री गीतिका त्यागी छेडछाड प्रकरणी आज (सोमवार) वर्सोवा पोलिसांनी अटक केली. कपूर यांना कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे प्रकरण दोन वर्षापूर्वीचे आहे. गीतिका त्यागी हिने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक खळबळजनक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये 'जॉली LLB'चे दिग्दर्शक सुभाष कपूर, त्यांची पत्नी आणि 'औरंगजेबचे' दिग्दर्शक अतुल सबरवाल दिसत आहेत. या व्हिडिओत सुभाष कपूर, गीतिकासोबत केलेल्या लैंगिक शोषणावर चर्चा करताना दिसत आहे.

व्हिडिओत कपूर म्हणताना दिसत आहेत, 'आमच्या दोघांत जे काही घडले त्याची मला लाज वाटत आहे. आता आम्हा दोघांनाही याचे परिणाम भोगण्यास तयार राहायला हवे. मला आता काय करायचे आहे, ते माहित नाही.'

व्हिडिओत कपूर यांची पत्नी म्हणतेय, की या घटनेमुळे ती उद्धवस्त झाली आहे. आता त्यांच्या मुलांना वडिलांच्या कृत्याचा सामना करावा लागणार आहे. वडील आपल्या मुलांची रक्षा करत असतात, मात्र आता वडिलांनी जे केले त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.

तर व्हाट द फिश, वन वाइ टू या सिनेमांमध्ये झळकलेली गीतिकाचे म्हणणे आहे, 'मी आता एकाही व्यक्तिवर विश्वास ठेऊ शकत नाही. मी माझे वडील, भाऊ-वहिनी यांचा सामना करु शकत नाही' सुभाष कपूर यांच्याशी झालेल्या वादादरम्यान गीतिकाने हा व्हिडिओ बनवला होता.

कोण आहे गीतिका त्यागी?
25 सप्टेंबर 1989 रोजी जन्मेली गीतिका बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी धडपडत आहे. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'आत्मा' या सिनेमात ती झळकली होती. 2008पासून तिने मोजक्या सिनेमांमध्ये अभिनय केला. 2011मध्ये रिलीज झालेल्या 'द इक्लिप्स ऑफ तारेगना' या सिनेमातही काम केले होते. गीतिकाच्या वडिलांचे नाव नरेंद्र पाल त्यागी तर आईचे नाव पुष्पा त्यागी आहे.

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून वाचा संपूर्ण प्रकरण...
(फाइल फोटो: गीतिका त्यागी आणि सुभाष कपूर)