आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची पहिली \'पारो\' सुचित्रा सेनची एक्झिट, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड आणि बंगाली सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक अमीट छाप सोडणा-या अभिनेत्री सुचित्रा सेन यांची आज (17 जानेवारी) सकाळी प्राणज्योत मालवली. त्या 82 वर्षांच्या होत्या.
सुचित्रा सेन अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या श्वसननलिकेत जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर कोलकातामधील बेल व्ह्यू क्लिनिक या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुचित्रा येन यांचा जन्म 6 एप्रिल रोजी कोलकात्यात झाला. रामा दासगुप्ता हे त्यांचे नाव. मात्र सिनेसृष्टीत त्या सुचित्रा सेन या नावानेच प्रसिद्ध होत्या. 1952 ते 1979 पर्यंत सिनेक्षेत्रात त्या कार्यरत होत्या. 1952 मध्ये ‘शेष कोठाई’ या बंगाली सिनेमातून सुचित्रा सेन यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सुचित्रा सेन यांना बंगाली सिनेमांमधील महानायिका असे म्हटले जात होते आणि आंधी या हिंदी सिनेमातील त्यांची भूमिका बरीच गाजली होती. सिनेसृष्टीतील बहुमोल्य योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि बंग विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या पॅकेजमधूम आम्ही तुम्हाला सुचित्रा सेन यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत...