आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Was Very Close To Bollywood Celebs

PICS: शाहरुखपासून ते प्रिती झिंटापर्यंत, अनेक सेलिब्रिटींबरोबर होती सुनंदाची मैत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनंदा पुष्कर राजकिय आणि बॉलिवूड वर्तुळातील चर्चित नाव. 17 जानेवारी रोजी सुनंदाने या जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी रात्री दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या रुम नंबर 345मध्ये ती मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूच्या एक दिवसाआधीच शशी थरुर यांच्यावरुन पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि तिच्यात ट्विटरवरुन शाब्दिक चकमक झाली होती. सुनंदा स्वतःला बिझनेस वुमन आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणणे पसंत करत होती. रिअल इस्टेटमध्ये तिला रुची होती.
सुनंदा स्पा ओनर तर होतीच. याशिवाय 2005 मध्ये ती टीकॉम या दुबई रिअल इस्टेट कंपनीची मॅनेजर झाली होती. दुबईत तिचे 15 ते 16 फ्लॅट्स असल्याचे म्हटले जाते. तिच्याकडे मुगल सम्राट हुमायुंची तलवारही होती.
रांडगू स्पोर्ट्स वर्ल्डमध्येही तिचे नाव सामील होते. कोच्ची आयपीएल टीममधून 70 कोटींची स्वीट इक्विटी मिळाल्याने ती बरीच चर्चेत आली होती. मात्र वाद वाढल्यानंतर तिने टीममधून काढता पाय घेतला होता.
सुनंदा हाय प्रोफाईल आणि पेज थ्री पार्टीजमध्ये जाणे पसंत करायची. याच कारणामुळे बॉलिवूडकरांशी तिचे चांगले संबंध होते. ती अनेकदा बॉलिवूड पार्टीज आणि इवेंट्समध्ये दिसली होती.
अनुपम खेर आणि संजय खान यांच्या कुटुंबाशी तिचे जवळचे नाते होते. शशी थरुर आणि सुनंदा यांचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. 2012मध्ये शशी थरुर यांच्या पॅक्स इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशनाला शाहरुख खानने हजेरी लावली होती.
सुनंदाच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सुनंदाची बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतची काही खास छायाचित्रे...