आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Dutt Life Rare Pictures And Rare Facts On His Birthday

B\'DAY: सिनेसृष्टीत येण्यापूर्वी मुंबईच्या लोकल बसमध्ये नोकरी करायचे सुनील दत्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1955 साली 'रेल्वे प्लॅटफॉर्म' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारे सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांचा आज वाढदिवस आहे. सुनील दत्त आज आपल्यात नाहीत, मात्र एक सर्वोत्कृष्ट कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून त्यांनी आपली छाप समाजावर सोडली आहे.
6 जून 1929 रोजी पाकिस्तानमधील झेलम (त्याकाळी भारतात) येथे जन्मलेल्या सुनील दत्त यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांच्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. ते अठरा वर्षांचे असताना भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उठलेल्या दंग्यातून याकूब नावाच्या मुस्लिम तरुणाने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले होते.
फाळणीनंतर सुनील आपल्या कुटुंबीयांबरोबर हरियाणाच्या यमुना नगर स्थित मंडोली गावात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी आपला काही काळ लखनऊमध्ये घालवला. येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुनील यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्येही शिक्षण घेतले. शिवाय रेडिओवर आरजे म्हणून नोकरीही केली.
सिलोन रेडिओमध्ये आरजेची नोकरी करत असताना त्यांच्या फिल्मी करिअरलाही सुरुवात झाली. असे म्हटले जाते की, जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी काही काळ मुंबईतील 'बेस्ट' या लोकल बसमध्येही नोकरी केली.
सुनील दत्त यांच्या आयुष्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी आणि त्यांची खासगी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...