आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Shetty's Daughter Worried About Suraj Pancholi

तुरुंगात सूरज पांचोली, काळजीत पडली सुनील शेट्टीची मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. आपल्या सुसाईड नोटमध्ये जियाने तिचा बॉयफ्रेंड सूरजला जबाबदार ठरवले आहे. पोलिसांनी सूरजला अटक केली असून तो 13 जूनपर्यंत पोलिस कोठडीत असणार आहे.
जियाच्या आत्महत्येला सूरजच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे सूरजचे करिअर सुरु होण्यापूर्वीच संपणार अशी चिन्ह आहेत. सूरज 'हीरो' या सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलमधून बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणार आहे. या सिनेमात सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसुद्धा झळकणार आहे.
सूरजला अटक झाल्यामुळे अथिया का काळजीत पडलीय हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...