आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील शेट्टीने खंडाळ्यात साकारले आपल्या स्वप्नातील घर, पाहा त्याच्या आशियानाचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टीने अलीकडेच आपल्या स्वप्नातील घर तयार केले आहे. मुंबईजवळील खंडाळा येथे सुनील आणि मानाने आपला स्वप्नातील आशियाना साकारला आहे. त्यांच्या या हॉलीडे होममध्ये सर्व चैनीच्या वस्तू उपलब्ध आहेत.
सुनील शेट्टीचे हे दुसरे घर आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह सुटी एन्जॉय करायला आपल्या खंडाळ्यातील या हॉलीडे होममध्ये येत असतो. चोहोबाजुंनी पसरलेली हिरवीगार पालवी, बौद्ध प्रतिमा आणि त्याचे लाडके पप्पीज या हॉलीडे होमची शोभा वाढवतात. सुनील आपल्या या घरी अनेकदा शानदार पार्टींचेही आयोजन करत असतो. घराच्या लॉन परिसरात एक सुंदर स्विमिंग पूलसुद्धा तयार करण्यात आला आहे.
सुनीलने पहिल्यांदाच मीडियाला त्याच्या या आलिशान घराची छायाचित्रे घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्याच्या या स्वप्नातील घराची छायाचित्रे समोर आली आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सुनील शेट्टीच्या स्वप्नातील आशियाना कसा आहे, हे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सुनीलच्या आलिशान घराची ही खास झलक...