आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत तिस-यांदा 'फेतह सिंह' डब्बाबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांचा आगामी चित्रपट ‘फतेह सिंह’ पुन्हा एकदा डब्बाबंद झाला आहे. सनी देओलची मार्केट पोजीशन यामागचे कारण असल्याची चर्चा आहे.

‘यमला पगला दीवाना 2’ आपटल्यानंतर सनीचे दुसरे मोठे चित्रपट देखील अडचणीत आले आहेत. अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची परिस्थिती सांगत आजोबा आणि नातवाच्या कथेवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी चित्रपट बनवण्याचा विचार करत होते. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी सनीला तीन महिने न्यूयॉर्कमध्ये राहावे लागणार होते. मात्र सनीवर डाव लावण्यासाठी संतोषीसारख्या खर्चीक दिग्दर्शकाला कोणीही फायनान्सर पैसा देऊ इच्छित नाही.

दुसरीकडे, वायकॉम 18ने सनीला ‘घायल 2’ साठी 10 कोटी रुपये दिले होते. मात्र ‘घायल 2’चा दिग्दर्शक राहुल रवैलसोबत वाद झाल्यामुळे हा चित्रपटदेखील पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे इंडस्ट्रीत आपले स्थान उंचावण्यासाठी सनीने ‘इंडियन 2’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक महाराजनसोबत ‘इंडियन 2’ बनवण्यासाठी सनीने सगळ्या तारखा संतोषीकडून परत घेतल्या आहेत. त्यामुळे ‘फतेह सिंह’ तीन वर्षांत तिसर्‍यांदा पुन्हा एकदा सुरू होण्याआधीच बंद झाला आहे.