आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सनीने केले ऑटोरिक्षावर ‘रागिनी MMS-2’चे प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनला मुंबईमध्ये ऑटोवाल्यांसोबत तिच्या 'रागिनी एमएमएस 2'चे प्रमोशन करणे महागात पडले आहे. झाले असे, की सनी तिच्या सिनेमाचे ऑटोरिक्षामधून प्रमोशन करत होती. प्रमोशनदरम्यान सनीला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली परंतु चक्क ऑटोरिक्षावाले तिच्या मागे लागले होते. बघता बघता सर्व वातावारण अस्थव्यस्त झाले. त्यावेळी तिथे पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर पोलिसांनी तेथील गर्दीची सावरासावर करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
5000 ऑटोच्या आधारे प्रचार करणार होती सनी
सनी तिथे तिच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या ऑटोरिक्षांना हिरवा झेंडा दाखवायला आली होती. या प्रमोशन अभिनयात जवळपास 5000 हजार ऑटोंवर 'दो में ज्यादा मजा है' आणि 'रागिनी का नया एमएमएस देखा क्या' असे पोस्टर्स लावलेले होते. 'रागिनी एमएमएस 2'च्या पहिल्या मालिकेचेही असेच प्रमोशन करण्यात आले होते. तेव्हा ऑटोंवर स्लोगन लिहिण्यात आले होते, 'यही पर रागिनी बैठी थी'. परंतु त्यावेळी प्रमोशनमध्ये कोणत्याच प्रकारची घटना घडली नव्हती.
सनी लिओनचा 'रागिनी एमएमएस 2' हा 2011मध्ये आलेल्या 'रागिनी एमएमएस'चा सिक्वल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन भूषण पटेलने केले असून निर्मिती एकता कपूरने केली आहे. 'रागिनी एमएमएस 2'चे अलीकडेच दोन गाणी 'बेबी डॉल' आणि 'चार बोटल व्होडका' रिलीज झाले आहेत. ही दोन्ही गाणी यू-ट्यूबवर सर्रास बघितली जात आहेत. सनीचा हा सिनेमा 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'रागिनी एमएमएस 2'ची काही छायाचित्रे...