आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone In Different Style At The PC For Ragini MMS 2

PICS: ऑटो रिक्शात दिसला सनीचा हटके अंदाज, बघणारे बघतच राहिले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -‘जिस्म-2’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी अभिनेत्री सनी लियोनला चर्चेत राहणे पसंत आहे, असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. सध्या सनी ‘रागिनी MMS-2’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चर्चेत आहे. सनीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहे. त्यामुळे सनी सध्या भलतीच खूश आहे. हा सिनेमा रिलीज होऊन आता जवळजवळ एक आठवडा उलटला आहे. रिलीजच्या आठवड्याभरानंतरसुद्धा सनीने सिनेमाचे प्रमोशन करणे सुरु ठेवले आहे.
अलीकडेच सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सनी मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. साडी परिधान केलेली सनी यावेळी ऑटो रिक्शात फिरताना दिसली. सनीला साडी आणि ऑटो रिक्शात बघून देखणारे अवाक् झाले.
यावेळी सनी चक्क ऑटो रिक्शातून ‘रागिनी MMS-2’च्या पत्रकार परिषदेत पोहोचली होती. या पत्रकार परिषदेत सनीला 'बेबी डॉल' या गाण्याचे संगीतकार मीत ब्रॉस आणि दिव्या दत्ता यांची साथ मिळाली.
सनीचा ‘रागिनी MMS-2’
‘रागिनी MMS-2’ हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झालेल्या ‘रागिनी MMS’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमात सनीचा बोल्ड अंदाज बघायला मिळत आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने तीस कोटींच्या घरात व्यवसाय केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा सनीचा हटके अंदाज...