आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रागिनी...’ चालेल न चालेल सनी नक्की चालणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जिस्म 2’ सिनेमातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारी पोर्न स्टार सनी लियोन सध्या आपल्या आगामी ‘रागिनी एमएमएस 2’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाची निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर आहे. आपल्या सिनेमाला यश मिळावे म्हणून एकता कपूर सनी लियोनला घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेली होती. तिथे त्यांनी काकड आरतीमध्ये भाग घेतला. त्यानंतर एकताने विशेष पूजा ठेवली होती.

सिद्धिविनायकाच्या मंदिरात ठेवलेल्या या पूजेत ‘रागिनी एमएमएस 2’ सिनेमातील सर्व कलाकार आले होते. शिवाय काही व्हीआयपीसुद्धा आले होते. एकता सनीला बॉलिवूडच्या इतर तारकांप्रमाणे राहण्याचे शिकवत आहे. आपल्या प्रत्येक सिनेमाच्या आधी देवाचे दर्शन करण्याचे एकताने सनीला सांगितले आहे. सनीची पोर्न इमेज बदलावी म्हणून एकताने असा सल्ला दिला असावा. त्यामुळे रागिनी चालो ना चालो सनी नक्कीच चालणार आहे.

मुंबईच्या या मंदिरात मोठ मोठे कलावंत रिलीज आधी, सिनेमाला यश मिळावे म्हणून येतात. कतरिना कैफपासून ते सलमानपर्यंत सर्वच कलावंत या मंदिरात हजेरी लावतात. एकता प्रत्येक सिनेमाच्या वेळी मंदिरात येऊन प्रार्थना करते.