सनी लिओन अभिनीत 'रागिनी MMS 2' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सोबतच, प्रेक्षक वाट बघत आहेत तिच्या 'बेबी डॉल' गाण्याची. या गाण्यात सनी लिओन तुम्हाला एका पिंज-यात डान्स करताना दिसणार आहे. अलीकडेच, सनीच्या 'बेबी डॉल' गाण्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे इंटरनेटवर लोकांच्या बरीच पसंतीस पडली असून लोक ती सर्वाधिक बघत आहेत.
सनीने या गाण्यात एका पिंज-यात डान्स करून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कारण स्टेजवर डान्स करण्याच्या तुलनेत एका पिंज-यात डान्स करणे खूप कठिण आहे, ते सनीने करून दाखवले आहे. सनीने या डान्स परफॉर्मेन्ससाठी खूप मेहनत घेतली आहे. तिने लगातार 6 तास प्रॅक्टिस करून डान्सची एक-एक स्टेप खूप मेहनतीने केली आहे.
सनीचे 'बेबी डॉल' हे गाणे 16 फेब्रुवारीला मुंबई अंधेरीच्या इंफिनिटी मॉलमध्ये लाँच केले जाणार आहे. सोबतच, सनी तिथे 'बेबी डॉल' गाण्यावर परफॉर्मेन्ससुध्दा देणार आहे.
सनीचा 'रागिनी MMS 2' हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमा एकता कपूरने आणि शोभा कपूर या दोघांनी निर्मित केला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले आहे. हा सिनेमा 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अलीकडेच, समोर आलेल्या सनीच्या 'बेबी डॉल' गाण्याची काही छायाचित्रे...