आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रागिनी MMS 2’मध्ये सनी लिओनचा भितीदायक अवतार, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन तिच्या आगामी 'रागिनी एमएमएस 2' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. ती कधी ऑटोरिक्षाव्दारा सिनेमाचे प्रमोशन करताना दिसते तर कधी एखाद्या हॉटेलच्या कार्यक्रमात सामील होऊन प्रचार करते. सनीचे म्हणणे आहे, की 'रागिनी एमएमएस 2'मध्ये पहिल्या मालिकेपेक्षा जास्त मनोरंजन होणार आहे. सिनेमात सुंदर सनी लिओन भितीदायक भूताच्या अवतारात दिसणार आहे.
'रागिनी एमएमएस 2'मध्ये सनीचा हा नवीन अवतार तुम्हाला भितीदायक वाटणार हे नक्की. ती सिनेमात हॉट लूकसोबतच भूताच्या अवतारात दिसणार आहे. सनीच्या सिनेमाच्या ट्रेलरने देशभरात धूम घातली आहे. तिचे 'बेबी डॉल' हे सिनेमातील गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यात आता तिचा हॉरर अवतार त्यात चांगलीच भर घालेल.
सनीच्या मेकअपकडे बघून जाणवते, की हा सिनेमा 'रागिनी एमएमएस'च्या तुलनेत जास्त हॉरर आहे. अर्थातच 'रागिनी एमएमएस'च्या दुस-या मालिकेत सनी तिच्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करणार हे मात्र नक्की. सिनेमाचे दिग्दर्शन एकता कपूरने केले असून 21 मार्च रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सनीने 'रागिनी एमएमएस 2'मध्ये कसा दाखवला नवीन अवतार...