आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Salman Holds Audiences Spellbound At Conclave

सल्लू म्हणाला, 'पहिल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले असते तर आत्तापर्यंत आजोबा झालो असतो'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा अंदाजच निराळा आहे. तो जेथेही जातो, तेथे आपल्या खास अंदाजाने आपल्या चाहत्यांना वेड लावतो. अलीकडेच एका मीडिया हाऊसच्या वतीने मुंबईत आयोजित कॉन्क्लेवमध्ये पोहोचलेल्या सलमानचा असाच हटके अंदाज बघायला मिळाला.
दबंग सलमान खानच्या गर्लफ्रेंडची लिस्ट किती लांबलचक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक अभिनेत्रींसह त्याचे नाते घनिष्ठ राहिले आहे. मात्र सलमान अद्याप एकीविषयीसुद्धा गंभीर झाला नाही. नात्यावरील कमिटमेंविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर सलमानने जे उत्तर दिले, ते ऐकुन सर्वच हैराण झाले.
सलमानने म्हटले, ''जर मी माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले असते, तर आत्तापर्यंत आजोबा झालो असतो.'' सलमानच्या या वक्तव्यावरुन तो कमिटमेंटमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही, असंच दिसून येतंय.
सलमान पुढे म्हणाला, ''सध्या मी ग्रीन टी घेतोय, कारण बिर्यानीच्या फक्त सुगंधाने माझं वजन वाढतं. मला लहान मुले खूप आवडतात, मात्र त्यांच्या मम्मी नाहीत.''
इतकेच नाही तर यावर्षी काहीतरी नवीन घडणार असल्याचे संकेतही त्याने दिले. त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे.
सलमानने मीडिया हाऊसच्या वतीने आयोजित कॉन्क्लेवमध्ये तालही धरला. शिवाय तो या कार्यक्रमात शर्टलेससुद्धा झाला. त्यानंतर सलमानच्या शर्टचा लिलाव करण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कॉन्क्लेवमध्ये पोहोचलेल्या सलमानचे खास PICS