आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suraj Mother Zarina Wahab Says\' It\'s An Old Love Letter Of Jiah Khan Not A Sucide Note\'

सुसाईड नोट नव्हे, बॉयफ्रेंडला लिहिलेले जुने प्रेमपत्र आहे ते 6 पानी लेटर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची आई जरीना वहाब यांनी पहिल्यांदाच आपले मौन तोडले आहे.
जरीना वहाब यांनी जियाच्या सुसाईड नोटबद्दल सांगितले, ते सुसाईड नोट नसून एक जुने प्रेमपत्र आहे. जे जियाने सूरजला खूप पूर्वी लिहिले होते. त्यामुळे त्या पत्राला सुसाईड नोट म्हटले जाऊ शकत नाही.
जियाने हे पत्र लिहून स्वतःजवळ ठेवले होते. त्यामुळे त्या पत्राला सुसाईड नोट म्हणणे चुकीचे ठरेल. जरीना वहाब यांनी पुढे सांगितले की, सुसाईड नोट सहा पानांचे नाही तर छोटे असते.
जियाने 3 जूनच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने 9 जूनला तिचे सहा पानांचे कथित सुसाईड नोट पोलिसांना दिले. पत्रावरुन जियाच्या आत्महत्येला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
जियाने पत्रात सूरजने तिला धोका दिल्याचे म्हटले आहे. सूरज जियाला मारहाण करायचा. त्याने तिच्यावर बलात्कारही केला होता. शिवाय तिचे अबॉर्शनही केले होते.