आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आणि तिचा प्रियकर सूरज पांचोलीला जुहू पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी कलम ३०६ अंतर्गत सोमवारी दुपारी सूरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर त्याला अटक करण्यात आली.

जियाने लिहिलेल्या पत्रात तिचा स्वप्नभंग होण्यास सूरज कसा कारणीभूत आहे, यावर प्रकाश टाकल्याने त्याची अटक अटळ समजली जात होती. जियाच्या आत्महत्येनंतर तिच्या बेडरूममध्ये तिच्या कुटुंबीयांना तिचे सहा पानी पत्र सापडले होते. पत्रात जियाने सूरजबद्दल असलेले प्रेम आणि त्याच्याकडून नेहमीच मिळालेल्या तिरस्काराच्या वागणुकीबद्दल लिहिले आहे. जियाची आई रझिया खान यांनी हे पत्र पोलिस आणि प्रसिद्धिमाध्यमांना दिले.

या पत्राचा अभ्यास करून सूरजची वागणूक आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. सूरजला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सूरजला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.