आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरज पांचोलीला जामीन मंजूर, तुरुंगातून झाली सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आणि जिया खान आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई कोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला. पन्नास हजार रुपयांचा जातमुचलका व पारपत्र (पासपोर्ट) जमा करण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक दिवसाआड त्याला पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

सूरजवर त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जियाने 3 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.