आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suraj Pancholi Was Just 2 Minutes Away From Jiah\'s Home On Night Of Her Death

CCTV फुटेजमध्ये दिसला सूरज पांचोली; जियाच्या मृत्यूसमयी तो होता जवळपास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याच्यावर बॉलिवूड अभ‍िनेत्री जिया खानच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी सूरजचे माता-पिता त्याच्या बचावासाठी पुरावा म्‍हणून सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर केले आहे. त्यांच्यामते जिया खानच्या हत्येत सूरज याचा हात नाही. जियाचा मृत्यू झाला तेव्हा सूरज तेथे उपस्थित नव्हता. सूरजने कोणताही गुन्हा केलेला नाही.

दरम्यान, 25 वर्षीव जिया खान हिचा मृतदेह जुहू येथील तिच्या राहत्या घरात आढळून आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी तिचा बॉयफ्रेंड सूरज याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या सूरजला सोडून देण्यात आले आहे.

जियाची आई राबिया खान यांनी जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा केला आहे. जियाच्या हत्येची चौकशी करावी, यासाठी राबिया खान यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तपासात पोलिस कसूर करत असल्याचाही आरोप राबिया खान यांनी केला आहे.

राबिया खान यांनी जियाच्या हत्येप्रकरणी सूरज पांचोलीला जबाबदार ठरवले आहे. मात्र जियाचा मृत्यू झाला तेव्हा सूरज त्याच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये होता. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही आदित्य पांचोली याने कोर्टात सादर केले आहेत.
संपूर्ण वृत्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...