Home »Top Story» Survey For Inkaar Film

‘इंकार’साठी 2 कोटींचा सर्व्हे

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 12:09 PM IST

  • ‘इंकार’साठी 2 कोटींचा सर्व्हे

‘इंकार’ सिनेमा कॉर्पोरेट कार्यालयात होणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या लैंगिक छळावर आधारित आहे. या सिनेमासाठी वायाकॉम 18 या सर्वात मोठ्या सर्व्हे कंपनीने भारतातील प्रमुख शहरांत एक सर्व्हे केला आहे. मोठमोठय़ा ऑफिसमधील महिलांचे मत जाणून घेण्यात आले. यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला. ऑफिसमध्ये अधिकारी 10 ते 12 तास काम करतात. अशा परिस्थितीत प्रेम किंवा मैत्री होणे स्वाभाविक आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्व्हे दिल्ली, मुंबई, पुणे, चंडीगढ आणि कोलकातामध्ये करण्यात आला आहे.

Next Article

Recommended