आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushant Singh And Praineeti Chopra Kept Live In Relationship For Shooting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 दिवस एका खोलीत राहिले सुशांत-परिणीती, तेव्हा दिसला त्यांचा 'शुद्ध देसी रोमान्स'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा आपल्या आगामी 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमाच्या प्रोमो आणि गाण्यांमध्ये त्यांची रॉकिंग केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

विशेषतः 'तेरे मेरे बीच में' या गाण्यातील दोघांची ट्युनिंग बघून सगळेच दंग झाले आहेत. या दोघांमधील हे ट्युनिंग सहजासहजी जुळेलेल नाहीये बरं का. यासाठी या दोघांनी असे काही केले, ज्याचा विचारसुद्धा तुम्ही करु शकणार नाहीत.

या गाण्याच्या शूटिंगदरम्यान या दोघांनी तीन दिवस एकाच रुममध्ये एकत्र घालवले. दिग्दर्शकाला गाण्यात नायक-नायिकेचे लिव्ह इन रिलेशनशिप दाखवायचे होते. त्यामुळे त्यांच्यात ट्युनिंग जुळणं अतिशय महत्त्वाचं होते.
याच कारणामुळे दिग्दर्शक मनीष शर्माने गाण्याचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. सुशांत आणि परिणीतीने आपले प्रोफेशनॅलिझम जपत दिग्दर्शकाला यासाठी होकार दिला.

हे गाणे तीन दिवसांत शूट करण्यात आले आणि हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीलाही पडले आहे. येत्या 6 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सुशांत-परिणीती यांच्यातील केमिस्ट्रीची खास झलक...