आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput@ 28: Early Days Pictures Of The Actor

B\'DAY SPL: 28 वर्षाचा झाला \'शुध्द देसी रोमान्स\'चा स्टार, बघा त्याचे बालपणाचे काही UNSEEN PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आज (21 जानेवारी) वाढदिवस आहे. त्याचा जन्म 1986मध्ये बिहार येथे झाला. तो आता 28 वर्षाचा झाला आहे. झी टीव्हीची प्रसिध्द मालिका 'पवित्र रिश्ता'मधून ओळख निर्माण करणा-या सुशांत सिंहने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे स्वतःची बॉलिवूडचा हीरो म्हणून ओळख निर्माण केली.
त्यानंतर त्याने यशराज बॅनरचा 'शुध्द देसी रोमान्स'मध्ये काम केले. सुशांतचे सध्या 'पवित्र रिश्ता'ची को-स्टार अंकिता लोखंडेसोबत अफेअर चालू आहे. बातमी आहे, की दोघांनी मागच्या वर्षी एप्रिल 2013मध्ये लग्न केले आहे.
सुशांतने दिल्लीच्या प्रसिध्द बॅरी जॉन थिएटरमध्ये काम केले . त्यानंतर त्याने शामक दावरचे डान्स क्लासेससुध्दा जॉईन केले. सुशांत राजपूतला 'पवित्र रिश्ता' या मालिकेमधून ओळख मिळाली. परंतु 'किस मे रहता है मेरा दिल' हा त्याचा पहिला टीव्ही शो होता. या मालिकेत त्याच्या भूमिकेचे नाव प्रीत होते. सुशांतचा आवडता हॉलिवूडचा अभिनेता डेनिअल डे लुईस आहे, ज्याने 'गँग्स ऑफ न्यूयॉर्क'सारख्या सिनेमात काम केले आहे.
सुशांत शिक्षणात तर अग्रेसर होताच, सोबतच भौतिकशास्त्रात तो नॅशनल ओलंपियाडचा विजेता आहे. सुशांतने त्याचे करिअर एका डान्सरच्या रुपात सुरू केले होते आणि शामक दावरसोबत त्याने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. त्याने 2006मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि फिल्म फेअर अवॉर्ड्समध्ये सुध्दा डान्स परफॉरमन्स दिला होता.
सुशांत सिंह एकुण पाच भाऊ-बहिण आहेत, त्यांच्यात सुशांत सर्वात लहान आहे. जेव्हा तो 12वी मध्ये होता तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांत एक उत्कृष्ट डान्सरसुध्दा आहे. रिअलिटी शो 'जरा नच के दिखा' आणि 'झलक दिख ला जा 4'मध्ये त्याने सहभाग घेतलेला आहे.
सुशांत सिंह राजपूत त्याच्या करिअरमध्ये खूप परिपूर्ण आहे. त्याने एश्ले लोबोच्या ग्रुपमध्ये डान्स केला आहे. एलन अमीनकडून तो मार्शल आर्ट शिकलेला आहे आणि 'राज 2' सिनेमा निर्माणच्यावेळी त्याने सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरीला सहकार्य केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुशांतचे बालपणीचे छायाचित्रे...