आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Lands Lead Role In Shekhar Kapur's 'Paani'

‘पानी’ ठरणार भारताचा पहिला हॉलिवूड चित्रपट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य चोप्रा अत्यंत शांतपणे यशराज बॅनरला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्याची तयारी करत आहे. त्याचा चित्रपट ‘पानी’ या व्यूहरचनेचा खास हिस्सा आहे. याची कथा 2040 मध्ये पाणीटंचाईमुळे निर्माण होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या परिस्थितीवर आधारित असेल. यात पाण्यापासून वंचित असणारे गरीब लोक नायक असतील आणि पाण्यावर अधिकार गाजवणारे कॉर्पोरेट घराणे खलनायक असेल. डिस्टोपियन (खूप दूरचे काल्पनिक भविष्य असलेल्या कथा) जॉनर यांच्या अशा कथा विदेशात आणि जगातील सर्वच चित्रपट बाजारांमध्ये अधिक पसंत केल्या जातात. अशा वेळी विदेशी वितरकांना चित्रपट विकण्यात जराशीही अडचण येणार नाही. कथा, दिग्दर्शक आणि कलावंत तिन्ही पातळ्यांवर हा चित्रपट विदेशी असेल. आदित्य चोप्रा आपला हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे नव्हे, तर एका आंतररष्ट्रीय प्रकल्पासारखा सादर करणार आहे. यासाठी शेखर कपूर यांचे हॉलिवूड प्रोफाइल आणि उदय चोप्राची यशराज फिल्म्स एन्टरटेन्मेंट कंपनी सहकार्य करणार आहे. यशराज कंपनीने हॉलिवूड चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासा ठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...