आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर वसीम अकरमवर सुश फिदा, लवकरच अडकणार रेशीमगाठीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनविषयींच्या अफवाचे बाजार पुन्हा एकदा गरम झाले आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अकरमबरोबर डेट करत आहे. शिवाय लवकरच हे दोघे लग्नगाठीतही अडकणार आहेत.
विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच हे दोघे एकत्र डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
सध्याच्या काळात अनेकदा सुश्मिताच्या लग्नाविषयीच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र सुश्मिता कधीही उघडपणे याविषयावर बोलली नाही.
हं पण आता लग्नाविषयी विचार करत असल्याचे तिने एकदा म्हटले होते. एका मुलाखतीत सुश म्हणाली होती की, ''मी पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत आहे. ती योग्य वेळ असेल. तसेही मी सगळ्यांना खूप वाट बघायला लावली आहे.''
तर दुसरीकडे सुश्मिताच्या प्रवक्त्याने ती लग्न करत असल्याची बातमी नाकारली आहे. एवढ्या लवकर लग्नाची घोषणा करण्याची तिची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.