आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sussanne Is Busy Partying Post Separation With Hrithik Roshan

हृतिकपासून विभक्त होताच सुझान एन्जॉय करतेय नाइट क्लब पार्ट्या, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुझान हृतिकपासून वेगळी झाल्याने खूप आनंदात दिसत आहे, कारण अलिकडेच ती एका पार्टीचा आनंद लुटताना दिसली होती.
एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याची पत्नी सुझानपासून वेगळा झाल्याने आजही उदास आहे. परंतु याचा सुझानवर काही परिणाम झालेला नाही. ती तिचे आयुष्य आनंदात जगत आहे.
अलीकडेच, सुझान तिचा भाऊ जाएद खान आणि त्याची पत्नी मलाइकासोबत मुंबईच्या एका नाइट क्लबमध्ये गेली होती. तिला बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. कुणीच असा अंदाजसुध्दा लावला नव्हता, की सुझान हृतिकपासून वेगळी होताच एका महिन्यामध्ये अशा पार्टीत दिसेल.
हृतिक सुझानच्या घटस्फोटाने आजही अस्वस्थ आहे आणि बराच तणावातही राहतो. त्यावेळी सुझानला काही लोकांनी विचारले, कशी आहेस? तेव्हा तिने उत्तर दिले, 'मी एकदम ठिक आहे आणि खूप आनंदी आहे.'
क्लबमध्ये सुझानने डान्स फ्लोअरवर डान्ससुध्दा केला. या पार्टीत सुझान आनंदी दिसली आणि तिने बरीच धमाल-मस्तीही केली. ब-याच उशीरापर्यंत सुझान, जाएद आणि मलाइका पार्टी एन्जॉय करत होते.
यापूर्वी सुझान अनेकदा पार्टी, नाइट क्लब्स आणि पब्समध्ये एन्जॉय करताना दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुझानची नाइट क्लबमध्ये एन्जॉय करताना काही छायाचित्रे...