आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकपासून विभक्त होताच सुझानने बदलला हातावरील टॅटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी डिसेंबरमध्ये हृतिक रोशन आणि सुझान त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. सध्या हृतिक कतरिना कैफसोबत 'बँग बँग' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर सुझानसुध्दा तिच्या मित्रमैत्रीणींसोबत पार्ट्या करण्यात व्यस्त आहे.
अलीकडेच, सुझानला बांद्रामध्ये अशाच एका पार्टीत बघितले. त्यावेळी तिने क्रिम रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केलेला होता आणि त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु तिच्या उजव्या हातावर बनवलेल्या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
ती जेव्हा हृतिकसोबत राहत होती, तेव्हा दोघांच्या डाव्या हातावर टॅटू गोंदलेले होते. परंतु यावेळी सुझानच्या हातावर नवीन टॅटू दिसला. त्यामध्ये स्टार आणि त्यामध्ये काहीतरी लिहलेले दिसत होते. सुझानचे हे टॅटू दीपिकाच्या RK टॅटूची आठवण करून देत होते. दीपिकानेही रणबीरपासून विभक्त होताच ते मिटवले होते.
बांद्रामध्ये झालेल्या या पार्टीत सुझानच्या मित्रमैत्रीणींसोबत सलमान खानची बहीण अर्पितासुध्दा दिसली. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या पार्टीमध्ये आलेल्या काही सेलेब्सची छायाचित्रे...