आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या आईची भूमिका साकारण्यास तब्बूचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्या भूमिका आहेत. यामध्ये 42 वर्षीय तब्बूला प्रियांका चोप्राच्या आईची भूमिका करण्याचा प्रस्ताव दिला होता. झोया अख्तर आईच्या भूमिकेसाठी तब्बूला अत्यंत योग्य असल्याचे मानत होती. मात्र, तब्बू ही भूमिका करण्यास उत्सुक नव्हती. सूत्रांनुसार, तब्बूला या विचारानेच संकोच वाटला की, तिला स्वत:पेक्षा 11 वर्षे लहान असलेल्या प्रियांकाच्या आईची भूमिका करण्यास सांगण्यात आले.

तब्बू आजही स्वत:ला प्रमुख भूमिका करण्यास योग्य मानते. ‘चिल्लर पार्टी’ फेम दिग्दर्शक विकास बहलच्या आगामी चित्रपटात तब्बू आणि शाहिद कपूर एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. तब्बूने यापूर्वी चरित्र भूमिका साकारल्या आहेत. ‘जय हो’मध्ये ती सलमान खानच्या मोठय़ा बहिणीच्या भूमिकेत होती. मीरा नायरच्या ‘नेमसेक’मध्ये तिने अमेरिकी-भारतीय अभिनेता काल पेनच्या आईची भूमिका साकारली होती.