आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमन्ना होणार पुढची बॉलिवूड दिवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ आणि तेलुगू सिनेमांवर राज्य करणारी सुपरस्टार तमन्ना भाटिया लवकरच बॉलिवूडवरसुद्धा राज्य करू शकते, असे तिला लाँच करणारा दिग्दर्शक साजिद खान म्हणाला आहे. अलीकडेच एका डान्स रिअँलिटी शोमध्ये ती ‘हिम्मतवाला’च्या प्रमोशनसाठी आली होती. तिथे तिने काही गाण्यांवर जबरदस्त नृत्य सादर केले. ते पाहून साजिदसह सगळ्यांनीच तिचे कौतुक केले. तिच्या नृत्याचीच नव्हे तर तिच्या अभिनयाचीसुद्धा खूप चर्चा होत आहे. बॉलिवूडमध्ये तिचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच ती लोकप्रिय झाली आहे आणि तिला अनेक मोठय़ा दिग्दर्शकाकडून ऑफर्ससुद्धा मिळू लागले आहेत, तर पाहू तमन्ना पुढची बॉलिवूड दिवा होते की नाही.