आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बोल्ड फोटोशूट करुन या मॉडेलने मागितली राहुल गांधींसाठी मते !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल तनिषासिंहने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून तनिषाने राहुल गांधींसाठी मतदानाचे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे मतदारांना खुश करण्याचे उपाय राजकीय पक्ष शोधत आहेत. त्यात काही अभिनेत्री आणि मॉडेल्स यांनीही राजकारणात रस दाखवण्यास सुरुवात केली आहे. राजकीय नेते त्यांच्या भाषणांमधून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर, दुसरीकडे मॉडेल वेगळ्याच पद्धतीने राजकीय पक्षांसाठी मताचे दान मागत आहेत.
दोन दिवसांपूर्वी मेघना पटेलने बोल्ड अंदाजात कमळ फुलांवर फोटोशूट केले होते, आणि मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता तनिषासिंहने मेघनाच्याच अंदाजात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी फोटोशूट केले आहे. यात तिने अंगावर काँग्रेसचा झेंडा गुंडाळला आहे तर, हातात राहुल गांधी यांचे पोस्टर आहे.
याबद्दल दिल्ली काँग्रेसचे प्रभारी शकील अख्तर यांच्याशी 'दिव्य मराठी नेटवर्कने' संपर्क केला असता त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की यावर काही न बोलणे हेच योग्य आहे.
काही दिवसांपूर्वी तनिषाने फॅन्सना खुश करण्यासाठी लेडी गागाची कॉपी करीत बकरीच्या कातड्याचे कपडे घातले होते. मात्र, तिचा हा प्लॅन फ्लॉप ठरला होता. मेघना पटेलला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर, सध्याच्या गरम राजकीय तव्यावर तिने प्रसिद्धीची पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मॉडेलने बोल्ड अंदाजात समर्थन करण्याची पद्धती पुनम पांडेने सुरु केली आहे. 2011च्या विश्वचषक क्रिकेट सामन्यादरम्यान तिने भारतीय संघासाठी बोल्ड फोटोशूट करण्याची घोषणा केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तनिषाचा बोल्ड प्रचार आणि याआधी कोणी-कोणी लढविली ही आयडिया