आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: तनिषाने राहुल गांधींसाठी केले व्हॅलेंटाइन स्पेशल बोल्ड फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल तनिषा सिंहने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसाठी पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केले आहे. यावेळी तिने राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी व्हॅलेंटाइन स्पेशल बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तनिषाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केले आहे. तिने जो स्कर्ट परिधान केला आहे, त्यावर गुलाबाची फुले आहेत. तिने केसांतही गुलाबांच्या फुलांपासून तयार केलेला हेअरबॅण्ड लावला आहे. हे फोटोशूट तिने भर रस्त्यावर केले आहे. यामध्ये ती राहुल गांधींच्या पोस्टरसमोर उभी आहे. ‘OUR NEXT PM’ असे या पोस्टरवर लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने राहुल गांधींच्या प्रचारासाठीच एक फोटोशूट केले होते. यात तिने अंगावर काँग्रेसचा झेंडा गुंडाळला होता आणि हातात राहुल गांधी यांचे पोस्टर घेतले होते.
काही दिवसांपूर्वी तनिषाने फॅन्सना खुश करण्यासाठी लेडी गागाची कॉपी करीत बकरीच्या कातड्याचे कपडे घातले होते. मात्र, तिचा हा प्लॅन फ्लॉप ठरला होता. तनिषापूर्वी गुजरातची मॉडेल मेघना पटेलने नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी बोल्ड फोटोशूट केले होते.
कोण आहे तनिषा सिंह?
काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी बोल्ड होऊन प्रचार करणारी तनिषा सिंह अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मुंबईत जन्मलेल्या तनिषाला डॉक्टर व्हायचे होते. मात्र ग्लॅमर वर्ल्डमध्ये एन्ट्री घेताच तिने शिक्षण अर्धवट सोडले. फेमिना मिस इंडिया आणि मिस मुंबई कॉन्टेस्टमध्ये ती सहभागी झाली होती. फॅशन डिझायनरचे कपडे, उन्हाचे चष्मे आणि ज्वेलरीसाठी मॉडेलिंग करते. तनिषाने हिंदी, तामिळ, तेलगु सिनेमांत आयटम नंबरही केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा तनिषाच्या बोल्ड फोटोशूटची छायाचित्रे...