आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tanishaa Mukherji And Armaan Kohli To Get Engaged?

अरमान-तनिषा करणार आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब, लवकरच करणार साखरपुडा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'च्या घरात लव्ह स्टोरी सुरू करणारे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी अलीकडे दुबईमध्ये त्यांच्या वेळ घलवताना एकत्र दिसले. या लव्ह-बर्ड्सची अनेक छायाचित्रे माध्यमांमध्ये समोर आली आहेत. बातमी आली आहे, की या दोघांनी त्यांच्या अफेअरला एक वेगळे वळण देण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही स्टार्सच्या एका मित्राने सांगितले, 'तनिषा आणि अरमान यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते एकमेकांविषयी गंभीर आहेत. ते त्यांच्या नात्याचे गांभीर्य समजतात. अरमानचे यापूर्वीही अनेक अफेअर होते परंतु तो त्यात कधीच गंभीर झाला नाही. तनिषाविषयी अरमान खूप इमोशनल आहे. आता हे दोघेही साखपुडा करण्याच्या तयारीत आहे. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.'
सांगितले जाते, की तनिषाची आई तनुजा यांनीदेखील अरमानला स्वीकार केले असून त्यांना तनिषाच्या नात्याविषयी कोणतीच अडचण नाहीये. अरमानच्या कुटुंबीयांनासुध्दा तनिषाला सून म्हणून स्वीकारले आहे. तसे पाहता, बिग बॉसच्या घरात यांच्यामधील केमिस्ट्री तर सर्वांनीच बघितली आहे. आता बघूया तनिषा आणि अरमान किती लवकर त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडच्या काही मोठ्या घडामोडींविषयी...