गेल्या वर्षी 'चष्मेबद्दूर'मध्ये झळकलेल्या तापसी पन्नूने नुकताच आपला दुसरा हिंदी सिनेमा 'रनिंग शादी डॉट कॉम'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आतापर्यंत ती या सिनेमाच्या शूटिंगसाठी अमृतसर आणि पतियाळामध्ये होती. एका दक्षिण भारतीय सिनेमाचे चित्रीकरणही चंदिगडमध्ये सुरू होते. या वेळी तिला भेटण्यासाठी तेथे एक खास पाहुणा आला होता. 2012 ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारा बॅडमिंटनपटू मथियास बो असे त्याचे नाव आहे. मथियासने चित्रीकरणादरम्यान आणि नंतर पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवला.
तो परतल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याने तापसीसोबत काढलेला फोटो
फेसबुकवर अपलोड केला. आणि लिहिले की, 'फाउंड न्यू गर्लफ्रेंड.' त्यानंतर दक्षिणेतील तापसीच्या तेलगू चाहत्यांची मने दुखावली. नंतर मात्र हा फोटो फेसबुकवरून काढून टाकण्यात आला. मात्र, मथियासच्या मागच्या फोटोंमध्ये तापसीचे कॉमेंट पाहता येतील. त्याच्या एका सिंगल फोटोबाबत तापसी लिहिते, 'काही फोटोंमध्ये फोटोग्राफरचे (तापसी) कौशल्य दिसल्याशिवाय राहत नाही. तसे याबद्दल धन्यवाद. माझ्याशिवाय तू या फोटोत अधिक चांगले दिसू शकला असता का?' सेटवर उपस्थित असलेले सूत्र सांगतात की, दोघांमधील जवळीक वाढत असून त्यांची मैत्रीही बर्याच दिवसांपासूनची आहे.