आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला फिट समजत नाही परिणीती, या 7 अभिनेत्रीसुद्धा पहिले होत्या लठ्ठ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाद्वारे आपल्या चाहत्यांच्या हृद्याचे ठोके चुकवणारी अभिनेत्री परिणीती चोप्राने अलीकडेच म्हटले होते, की पडद्यावर बिकिनी परिधान करण्यास तिला काहीच हरकत नाही. मात्र बहीण प्रियांका चोप्राप्रमाणे फिगर झाल्यानंतरच बिकिनी परिधान करणार असेही तिने म्हटले.
एकेकाळी परिणीती आपल्या वाढत्या वजनामुळे बरीच काळजीत पडली होती. सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर फिट राहणे गरजेचे आहे, हे तिला ठाऊक होतं. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ती बरीच लठ्ठ होती. मात्र कठोर मेहनत आणि वर्कआउट करुन तिने स्वतःचे वजन कमी केले. आता ती पूर्वीप्रमाणे दिसत नाही. मात्र लठ्ठ असताना स्लीव्हलेस ड्रेस परिधान करु शकत नसल्याचे तिने म्हटले होते.
खरं तर वजन कमी करुन ग्लॅमर विश्वात पदार्पण करणारी परिणीती एकमेव अभिनेत्री नाहीये. परिणीतीप्रमाणेच बी टाऊनमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीदेखील ब-याच लठ्ठ होत्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या फॅटहून फिट होऊन बॉलिवूडमध्ये चांगल्याच स्थिरावल्या..