मुंबई - सोनम कपूर आणि आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'बेवकुफियां' या सिनेमातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सोनम आणि आयुष्मान रोमान्स आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. 'बेवकूफियां'तील या गाण्याचे शब्द आहे 'गुलछर्रे'. गाण्याच्या शब्दांप्रमाणेच सोनम आणि आयुष्मानची रासलीला गाण्यात बघायला मिळत आहे. या गाण्याला रघु दीक्षितने संगीतबद्ध केले आहे. तर गीतकार अनविता दत्त आहे.
'रांझणा' आणि 'भाग मिल्खा भाग' या सिनेमांमध्ये अगदी साधीसरळ दिसलेली सोनम या सिनेमात मात्र बरीच बोल्ड दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सोनम पहिल्यांदाच बिकिनीत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शिवाय तिने सिनेमात आयुष्मानसह किसींग सीन्सही दिले आहेत.
नुपुर अस्थाना दिग्दर्शित या सिनेमात आयुष्मान आणि सोनमसह ऋषी कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. रोमान्स आणि कॉमेडीचा तडका असलेला हा सिनेमा येत्या 14 मार्चला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा 'गुलछर्रे' या गाण्याची खास झलक...