आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rich Life Of Karisma Kapoor: Actress Has A Worth Beyond R 630 Crore

रुपेरी पडद्यापासून दूर राहूनसुद्धा करिश्माने उभे केले 630 कोटींचे साम्राज्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंककरिश्मा कपूर चित्रपटसृष्टीत सर्वात मोठे घराणे अर्थातच कपूर घराण्याची लेक आहे. करिश्माने 1990 साली आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. दिल तो पागल है, जुबैदा, बीवी नंबर वनसारखे सुपरहिट सिनेमे करिश्माच्या नावी आहेत. लग्नानंतर ती बरेच वर्षे रुपेरी पडद्यापासून लांब राहिली. मात्र झी टीव्हीवरील 'नच बलिये' या शोची परीक्षक म्हणून कमबॅक केल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक झाले.

करिश्मा राज कपूर यांची नात आहे. तर बबिता आणि रणधीर कपूर यांची लेक आहे. तिने बॉलिवूड अनेक बड्या स्टारबरोबर स्क्रिन शेअर केला आहे. जेव्हा ती पडद्यापासून दूर गेली, तेव्हासुद्धा तिने आपला क्लास मेन्टेन ठेवला आहे.

1994 ते 1997 या काळात तिने कॉमेडी सिनेमांमध्येही आपला हात आजमावला. 'राजा बाबू'पासून ते 'हीरो नंबर वन' असे बरेच कॉमेडी सुपरहिट सिनेमे करिश्माने दिले. या सिनेमात तिच्या अपोझिट गोविंदा होता. तर हे सिनेमे दिग्दर्शित केले होते डेविड धवन यांनी. इंडस्ट्रीत करिश्माला लोलो या पेटनेमने ओळखले जाते.

आता जर सर्वात रोचक गोष्टीबद्दल बोलायचे झाल्यास ही भारतीय अभिनेत्री एकुण 630 कोटींची मालकीण आहे. तिने आपली संपत्ती स्मार्ट शेअर इन्व्हेस्टमेंट्समध्ये गुंतवुण ठेवली आहे. शिवाय दिल्लीत तिचे अनेक रेस्तराँसुद्धा (फॅट कपूर बर्गर चेन) आहे. याशिवाय करिश्मा एका फुटबॉल टीम (मुंबई एंजल्स)चीसुद्धा मालकीण आहे. करिश्माने आपल्या ब्रॅण्डचा वोदका (प्योर वंडरकपूर - इंडिया) लाँच केला आहे. याशिवाय तिची एक फॅशन लाईनसुद्धा आहे. तिचे नाव 'करिश्मा कपूर सिडक्शन' असे आहे.