आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बींच्या \'जलसा\'मध्ये चोरांनी केला हात साफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एका वर्षाच्या आत ही दुसरी घटना आहे.

मागील वर्षी जुलैमध्ये बिग बींच्या रूममधून आठ हजार रुपयांची चोरी झाली होती. तपासानंतर दिलीप केवट नावाच्या इसमाने चोरी केल्याचे सिध्द झाले होते. यावेळी काही महागडे सामान आणि २५००० रुपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंबंधी घरात काम करणाऱ्या नोकरांची पोलिसांनी चौकशी केली आहे. बच्चन कुटुंबीय या चोरीची एफआयआर दाखल करू इच्छित नाहीत, यामुळे त्यांनी पोलिसांना नोकरांची फक्त चोकशी करण्यास सांगितले आहे.

सर्व नोकरांची पोलिसांनी चौकशी केली आहे. तीन नोकरांना लवकर सोडण्यात आले परंतु दोन नोकारांची खूप वेळ चौकशी करण्यात आली. या संदर्भात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.