आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Months Holidays Were Over, Sanjay Prison Today

संजयच्या तीन महिन्यांच्या सुट्या संपल्या, आज परतावे लागणार तुरुंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेल्या अभिनेता संजय दत्तला आज (21 मार्च) येरवडा तुरुंगात परतावे लागणार आहे. 21 डिसेंबर 2013 पासून संजय पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.
संजय दत्तला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी 42 महिन्यांची शिक्षा संजयने पूर्ण केली आहे. उर्वरीत साडे तीन वर्षांची शिक्षा त्याला भोगायची आहे.
पत्नी मान्यता दत्तच्या आजारपणामुळे तिची देखभाल करण्यासाठी संजयने सुटीचा अर्ज टाकला होता. 21 डिसेंबर 2013ला पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या संजयने दोनदा पॅरोलमध्ये वाढ करण्याची विनंती केली होती. यादरम्यान संजयने ख्रिसमस, नवीन वर्ष, महाशिवरात्री आणि होळी हे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरे केले.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा संजयला आत्तापर्यंत कितीवेळा पॅरोल मंजुर झाला...