आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायटलसाठी तिग्मांशूचा संघर्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माता- दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया आपल्या सिनेमाच्या टायटलविषयी फार पजेसिव्ह राहतात. त्यांचे म्हणणे आहे की, सिनेमाचे टायटल कात्रीसारखे असायला हवेत, जेणेकरून लोक त्याच्याकडे आकर्षित होतील. ‘पान सिंह तोमर’ सिनेमा बनवून प्रकाशझोतात आलेले तिग्मांशू प्रवाहापेक्षा वेगळे नाव ठेवण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सिनेमाला यशही तितकेच मिळते. म्हणूनच त्यांचे मित्रसुद्धा त्यांच्याकडूनच आपल्या सिनेमाचे नाव ठेवू इच्छित आहेत.

त्यांचा असिस्टंट करण बुटानी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत, त्याच्या सिनेमात क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून तिग्मांशू काम करत आहेत. मात्र या सिनेमाचे टायटल ठरवण्याचे काम तिग्मांशूवर सोपवले आहे. तिग्मांशू यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनला ‘घमासान’, ‘बुल बुल बुल बंदूक’, ‘गन चक्कर’ आणि ‘रायफल मॅन’सारखे नावं पाठवले आहेत. मात्र सगळे रिजेक्ट झाले आहेत. तरीही असेच आणखी टायटल पाठवेल, असे तिग्मांशू म्हणतात.