आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toifa Awards Creates A Major Controversy In Canada

\'टोयफा\' अवॉर्ड सोहळ्याच्या आयोजनावरुन कॅनडात गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील व्हँकुवर शहरात 4 एप्रिल ते 6 एप्रिल या काळात टोयफा अवॉर्ड सोहळा झोकात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं. मात्र आता हा अवॉर्ड सोहळा संपन्न झाल्यानंतर कॅनडामध्ये याच्या आयोजनावरुन गोंधळ निर्माण झाला आहे.

कॅनडातील वृत्तपत्रांनी (यामध्ये व्हँकुवर सन या वृत्तपत्राचाही समावेश आहे.) या सोहळ्यावर करण्यात आलेल्या खर्चामुळे गर्व्हर्मेंट ऑफ ब्रिटीश कोलंबियासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्थानिक मीडियात सुरु असलेल्या चर्चांनुसार, सरकारने बॉलिवूड कलाकारांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी करदात्यांचे 11 मिलियन डॉलर खर्च केले आहेत. मीडियाचा आरोप आहे की, स्थानिक सरकारने टुरिज्मला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या आयोजनात वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला.

व्हँकुवर वेस्ट अँड एमएलए स्पेंसर चंद्रा हर्बर्ट यांनी टोयफा अवॉर्डला पॉलिटिकल स्टंट म्हटले असून सरकारने यामागे व्यर्थ खर्च केला असल्याचे म्हटले आहे.