Home »Marathi Katta» Tom And Jerry Drama Play In Dubai

'टॉम आणि जेरी'ने केली दुबईवारी

भास्कर नेटवर्क | Jan 25, 2013, 14:48 PM IST

नवरा बायकोची भांडणे या रोजच्या जीवनातल्या विषयाला कल्पकतेची फोडणी देत वेगळ्या पद्धतीने मांडून प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या 'टॉम आणि जेरी' या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाने मुंबई, पुणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाऊसफुल्ल प्रयोग सादर केले. यशाचा हा आलेख कायम ठेवत अलीकडेच या नाटकाने दुबईतील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दुबईतील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

'टॉम आणि जेरी' या नाटकात गोपाळ आणि दिपा या विवाहीत जोडप्याची आगळीवेगळी कथा मांडण्यात आली आहे. निखिल रत्नपारखी आणि कादंबरी कदम या दोघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
अद्वैत थिएटर्सची निर्मिती असलेले हे नाटक निखिल रत्नपारखी यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.

Next Article

Recommended