आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या या सुपरहिट सिनेमांचे बनले रिमेक, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये सध्या गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. 70 आणि 80च्या दशकात सुपरहिट ठरलेल्या सिनेमांकडे आजचे दिग्दर्शक वळले आहेत. फक्त बॉलिवूडच्याच नव्हे तर साऊथच्या गाजलेल्या सिनेमांचेही रिमेक मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. विशेष म्हणजे या रिमेकला प्रेक्षकांची पसंतीची पावतीही मिळत आहे.

आज (शुक्रवार) 80च्या दशकातील सुपरहिट ठरलेल्या 'हिम्मतवाला' या सिनेमाचा रिमेक रिलीज झाला. जितेंद्र आणि श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला 'हिम्मतवाला' हा सिनेमा 1983 साली रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांना भावणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या रिमेकमध्ये अजय देवगण आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत आहेत.

तसे पाहता गेल्या ब-याच वर्षांपासून बी टाऊनमध्ये रिमेक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. आज आम्ही तुम्हाला गाजलेल्या सिनेमांच्या रिमेकबद्दल सांगतोय.

सुपरहिट ठरलेल्या कोणकोणत्या सिनेमांचे रिमेक आजवर आपल्या भेटीला आलेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...