आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TOP 21: These Are Bold And Controversial Posters Of Bollywood Movies

TOP 21: हे आहेत बॉलिवूड सिनेमांचे सर्वात वादग्रस्त आणि बोल्ड पोस्टर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा शुक्रवार प्रेक्षकांसाठी भितीदायक ठरू शकतो. कारण आज सनी लिओनचा 'रागिनी MMS 2' रिलीज होणार आहे. पहिल्या भागासारखाच हा भागदेखील हॉरर आहे. सनीने असेही सांगितेल आहे, की या दुस-या भागात प्रेक्षकांना जास्त मजा येणार आहे. पोर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये एंट्री करून सनीने तिची एक वेगळीच छबी बनवली आहे. तिने या सिनेमाचे प्रमोशनदेखील जोरदार केले. सनीला अपेक्षा आहे, की या सिनेमा बॉक्स ऑफिसवर यश नक्कीच मिळेल.
'रागिनी MMS 2'चे पोस्टर खूपच बोल्ड आहे. सिनेमाच्या अधिकतर पोस्टर्समध्ये सनी बोल्ड अंदाजातच दिसत आहे.
सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी आणि यशासाठी सनीने कोणतीच कसर सोडलेली नाही.
'रागिनी MMS 2' बोल्ड आणि वादग्रास्त आहे यात वादच नाही परंतु हे पहिले पोस्टर बॉलिवूडच्या सिनेमात रिलीज झालेले नाही. यापूर्वीही अनेक सिनेमांचे पोस्टर्स हे वादग्रस्त आणि बोल्ड होते. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी असे बोल्ड पोस्टर्स मोठे साधनच मानले जाते. त्यामुळे वाद निर्माण होतो जेणेकरून सिनेमा रिलीज होईपर्यंत चर्चेत राहतो.
'3 जी', 'हेट स्टोरी', 'द डर्टी पिक्चर', 'जोडी ब्रेकर्स', 'जिस्म 2', 'मर्डर 2', 'साहिब बीवी और गँगस्टर', 'काइट्स', 'राज', 'कुर्बान', 'आशिक बनाया आपने', 'ब्लड मनी', 'द डर्टी बॉलिवूड बॅचलर', 'हॅलो...कौन है', 'हीरोइन', 'हिस्स', 'इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘मस्तराम’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहा’सारख्या अनेक सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड बनवले गेले होते. यातील काही सिनेमे सोडले तर थिएटरपर्यंत प्रेक्षकांना आणण्यासाठी या सिनेमांचे पोस्टर्स अपयशी ठरले होते. पोस्टर्स बोल्ड बनवूनसुध्दा सिनेमे फ्लॉप झाले.
बॉलिवूडमध्ये बोल्ड पोस्टरचा ट्रेंड खूप जूना आहे. एकेकाळी फक्त A ग्रेड सिनेमांचे पोस्टर फक्त बोल्ड असायचे. परंतु आता बॉलिवूडच्या सामान्य सिनेमांचे पोस्टर्ससुध्दा बोल्ड दिसायला लागले आहेत. बॉलिवूडच्या बोल्ड पोस्टर्सच्या अशाच काही सिनेमांविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बोल्ड पोस्टर असणा-या सिनेमांविषयी...