आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पुरानी जीन्स\'च्या ट्रेलर लॉन्चमध्ये दिसला स्टार्सचा मस्त अंदाज, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तनुश्री चॅटर्जी बासू यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'पुरानी जीन्स' या आगामी सिनेमाचा 19 मार्च रोजी ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमात मेन लीडमध्ये असलेले तनुज विरवानी, आदित्य सील आणि इजाबेल्ले लिते हे कलाकार उपस्थित होते. हे तिन्ही स्टार्स यावेळी कुल मूडमध्ये दिसले. या तिघांसह सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या अभिनेत्री रती अग्निहोत्रीसुद्धा हजर होत्या.
सिनेमाचे शीर्षक 'पुरानी जीन्स' आहे, त्यामुळे तिघेही स्टार्स 'पुरानी जीन्स' नावाचे टी-शर्ट परिधान करुन होते. यावेळी या तिघांनीही फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
'पुरानी जीन्स' हा कमिंग ऑफ एज सिनेमा आहे. एका तरुणाभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले असून तो आपल्या गावी येऊन जुन्या मित्रांना पुन्हा भेटतो आणि येथेच कथेला एक रंजक वळण प्राप्त होते.
या सिनेमात तनुज, आदित्य आणि इजाबेल्लेसह रती अग्निहोत्री, सारिका, कामिनी कौशिक, कशिका चोप्रा आणि रजत कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
राम संपत यांनी सिनेमाची गाणी संगीतबद्ध केली असून मंजू लुल्ला या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. येत्या 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहा ट्रेलर लाँचदरम्यान क्लिक झालेली खास छायाचित्रे...