आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trishala Dutt Personal Party Pictures From Abroad

PHOTOS : वडील तुरुंगात, मात्र मुलगी परदेशात मैत्रिणींबरोबर करतेय मजा-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात बेकायदेशीररित्या हत्यारं बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सुप्रीम कोर्टाने संजयला साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयला शिक्षा सुनावण्यात आल्यापासून ते त्याची रवानगी तुरुंगात होईपर्यंत त्याची थोरली मुलगी त्रिशाला दत्त या संपूर्ण प्रकरणापासून लांब राहिली. दत्त कुटुंबीयांच्या या अडचणीच्या काळात संजयच्या मुलीच्या अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
अलीकडेच त्रिशालाने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भारतात न येण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''माझ्या कुटुंबीयांना अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. मीसुद्धा 2007 सालापासून मुंबई बघितलेली नाहीये. येथील मीडिया खूपच अ‍ॅक्टिव्ह आहे. भारतात येऊन मला मीडियात यायचे नव्हते. आमच्या कौटुंबिक गोष्टींना मीडियाने महत्त्व देऊ नये, असे मला वाटत होते. शिवाय माझ्या वडिलांनीच मला भारतात येण्यासाठी परवानगी दिली नव्हती.''
आई रिचा शर्माच्या निधनानंतर त्रिशाला अमेरिकेत आपल्या आजी-आजोबांबरोबर राहते. त्रिशाला नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंट आणि ब्लॉगवर स्वतःची छायाचित्रे शेअर करत असते. अलीकडेच त्रिशालाने तिची मैत्रिणींबरोबरची छायाचित्रे शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर बघा त्रिशालाची खासगी छायाचित्रे...