आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tuff Competition Between Shahrukh, Ajay, Ranbeer, Manoj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भास्कर बॉलिवूड अवॉर्डसच्या 'सुपरस्टार ऑफ द इयर मेल' या कॅटेगरीमध्ये टफ कॉम्पिटीशन पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडच्या पहिल्या ट्रुली डेमोक्रेटिक अवॉर्ड्स असलेल्या भास्कर बॉलिवूड अवॉर्डसची वोटिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. तुमच्या आवडत्या अभिनेत्याला तुमचे मत देऊन त्याच्याबरोबर रेड कार्पेटवर चालण्याची संधी तुम्ही मिळवू शकता. यावर्षीच्या नॉमिनेशन यादीवर एक नजर टाकली तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात टफ कॉम्पिटीशन पाहायला मिळत आहे.या कॅटेगरीत पहिले नॉमिनेशन मिळाले आहे अभिनेता अजय देवगणला. 'सिंघम' या चित्रपटाद्वारे रेकॉर्ड ब्रेक कमाई करुन बॉक्स ऑफिसवर आपला दम दाखवणारा अजय आपल्या प्रतिस्पर्धी अभिनेत्यांना टक्कर देतोय. या कॅटेगरीमध्ये दुसरे नॉमिनेशन मिळाले आहे अभिनेता ऋतिक रोशनला. 'अग्निपथ' या चित्रपटातील जबरदस्त अभिनयासाठी ऋतिकला हे नॉमिनेशन मिळाले आहे. ऋतिकचा 'अग्निपथ' हा चित्रपट यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील ऋतिकच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले. हा चित्रपट बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' या चित्रपटाचा रिमेक होता.
नॉमिनेशनच्या यादीत पुढचे नाव आहे 'डॉन' अर्थातच शाहरुख खानचे. 'डॉन 2' या चित्रपटासाठी शाहरुखला हे नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नॉमिनेशन यादीत रणबीर कपूरच्याही नावाचा समावेश आहे. 'रॉकस्टार' या चित्रपटाद्वारे रणबीरने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. शिवाय अनेक अवॉर्ड फंक्शनमध्येही रणबीरचा जलवा पाहायला मिळाला. प्रेक्षकांचा आवडत्या सलमान खानच्या नावाचाही समावेश या नॉमिनेशन लिस्टमध्ये आहे. 'बॉडीगार्ड' या चित्रपटाद्वारे सलमाननेही बेस्ट हिरोच्या कॅटेगरीमध्ये स्थान मिळवले आहे. शिवाय 'राऊडी राठौर' अक्षय कुमारसुद्धा या यादीत आहे. 'राऊडी राठौर' हा चित्रपट शंभर कोटीच्या क्लबमध्ये सामील झाल्यामुळे अक्षयला यशाची चव चाखता आली आहे.
'देल्ही बेली' या चित्रपटासाठी अभिनेता इम्रान खानलाही नॉमिनेशन मिळाले आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट या नॉमिनेशन लिस्टमध्ये मनोज बाजपेयीलाही स्थान मिळाले आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी मनोजला हे नॉमिनेशन मिळाले आहे.
तर मग आपल्या आवडत्या अभिनेत्याला मत देऊन त्याला 'सुपरस्टार ऑफ द इयर'चा किताब मिळवून द्या. भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स भारतातील पहिला असा अवॉर्ड आहे जिथे कोणतेही ज्युरी नाही. प्रेक्षक स्वतः आवडत्या कलाकाराला मत देऊन आपल्या सुपरस्टार निवड करतात. तर मग आपल्या सुपरस्टारची निवड करण्यासाठी www.divymarathi.com लॉग ऑन करा. मत नोंदवण्याची शेवटी तारीख 14 ऑगस्ट 2012 आहे.
'आप हैं तो स्टार हैं' : प्रेक्षकांना पडलेले माधुरी दीक्षित नावाचे सुंदर स्वप्न !
'आप हैं तो स्टार हैं' : अशाप्रकारे उदय झाला बॉलिवूडच्या 'अँग्री यंग मॅन'चा...
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं तो स्टार हैं' : ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य
'आप हैं तो स्टार हैं' : या घटनेमुळे मिळाली अक्षयच्या आयुष्याला कलाटणी