आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actor Ronit Ray Special Visit To Mumbai Divyamarathi Office

हॉटेलात काम करून काढले दिवस, अभिनेता रोनित रॉयने उगडला अभिनय प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते म्हणून वडिलांशी भांडण केले. त्यानंतर त्यांनी घरातून हाकलून दिले नसते, तर अभिनेता होण्याची जिद्द मनात निर्माण झाली नसती. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्लेट साफ करून मॅनेजमेंटचा अनुभव घेण्यापासून संघर्ष केल्यानेच आज अभिनय क्षेत्रात यशस्वी झालो आहे,’ अशी प्रांजळ कबुली देत प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने "दिव्य मराठी'च्या मुंबईतील कार्यालयास भेट देऊन मनमोकळा संवाद साधला.
‘इतना करो ना मुझसे प्यार’ या सोनी टीव्हीवर लवकरच सुरू होणार असलेल्या मालिकेच्या निमित्ताने रॉय या मालिकेत त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. या वेळी रोनितने दहा वर्षांपूर्वी एकता कपूरने मला ज्या ज्या भूमिका दिल्या त्या त्या आज प्रेक्षकांमध्ये आयकॉनिक इमेजेस म्हणून लोकप्रिय आहेत. तिच्यामुळे मी आज या क्षेत्रात भक्कमपणे उभा असल्याने ‘इतना करो ना..’ ही मालिका मी कथा ऐकता एकतावर विश्वास ठेवून स्वीकारली, असेही रॉयने या वेळी नमूद केले.
नागपूरमधून मुंबईत येत "जान तेरे नाम', "उडान'सारखे चित्रपट, "क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील मिहीरची भूमिका, "कसोटी'मधील भूमिका अशा अनेक भूमिकांनी मला आजपर्यंत घडवले आहे, असेही त्याने सांगितले.
राज बब्बरही छोट्या पडद्यावर : दरम्यान,ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दीघर्काळानंतर लाइफ ओके या वाहिनीवरील ‘पुकार - कॉल फॉर हीरो’ या मालिकेत दिसणार आहेत. रणविजय सिंग या जवानाची कथा या मालिकेमध्ये गुंफण्यात आली असून त्याच्या वडिलांची भूमिका राज बब्बर साकारणार आहेत. १९७२ मध्ये रंगभूमीद्वारे अभिनयक्षेत्रात आलेल्या बब्बर यांनी आता छोट्या पडद्याची लोकप्रियता आळखत मालिकेद्वारे पुन्हा या क्षेत्रात कमबॅक करण्याचे ठरवले आहे.
‘इतना करो ना..’मध्ये विभक्त झालेल्या पती-पत्नी त्यांच्या मुलांच्या नातेसंबंधांमधील चढ-उतारांचा आशय मांडण्यात आला आहे. आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीत ही मालिकादेखील महत्त्वपूर्ण यशस्वी ठरेल. प्रेक्षकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे ही मालिकाही त्यांना आवडेल. -रोनित रॉय, अभिनेता