आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विंकलला किडनी स्टोनचा त्रास, झाले ऑपरेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला किडनी स्टोनचा त्रास होता. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे याविषयी तिला स्वतःला ठाऊक नव्हते.
झालं असं, की शनिवारी रात्री ट्विंकलला पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकिय तपासण्यानंतर डॉक्टांनी तिच्या किडनीत स्टोन असल्याचे निदान केले. मात्र त्यावेळी रुग्णालयात त्यावेळी वरिष्ठ डॉक्टर हजर नसल्याने अक्षय कुमारने तिला ब्रीच कँडी रुग्णायलयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी ट्विंकलवर शस्त्रक्रिया करुन स्टोन काढण्यात आला. आता तिची प्रकृती ठिक असून सोमवारी संध्याकाळी तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.