आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट उदिता गोस्वामी अडकली लग्नगाठीत, पाहा खास छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही बॉलिवूडमध्ये सनई चौघडे वाजायला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उदिता गोस्वामी अलीकडेच दिग्दर्शक मोहित सूरीबरोबर लग्नगाठीत अडकली.
मुंबईतील हरे रामा हरे कृष्णा मंदिरात पंजाबी पद्धतीने उदिता आणि मोहित लग्नगाठीत अडकले. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांबरोबर काही जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी उदिता लाल रंगाच्या लहेंगाचोलीत खूपच सुंदर दिसली. तर मोहितसुद्धा लाल शेरवानीत हॅण्डसम दिसला.

उदिता 'पाप', 'जहर' या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली आहे. तर मोहितने जहर, कलयुग, वो लम्हें, आवारापन, राज, क्रुक, मर्डर 2 हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

पाहा उदिता आणि मोहितच्या लग्नाची ही खास छायाचित्रे...