आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरुमध्ये ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीकचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. देशातील नामवंत फॅशन डिझायनर्स या व्यासपीठावर विविध प्रकारचे पोषाख सादर करतील. यानिमित्ताने फॅशन वीकच्या आयोजकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी विशेष चर्चा केली. त्यातील काही अंश...
आपण दिर्घ कालावधीपासून फॅशन उद्योगाशी जुळलेले आहात. फॅशन आणि तुमच्या ब्रँडला कशा पद्धतीने पाहता?
ब्लेंडर्स प्राईड एक उच्च प्रतिचा लक्झरी व्हीस्की ब्रँड आहे. फॅशनशी हा ब्रँड 10 वर्षांपूर्वी जुळला. तेव्हापासून ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर आता डिझायनर्स, ब्रँड्स, स्टाईल आणि ग्लॅमरचा अनोखा संगम बनला आहे. यापूर्वी आशिष एन. सोनी, अस्मिता मारवा, गेविन मिग्यूएल, मंदिरा विर्क, नंदिता महतानी, नीता लुल्ला, निदा महमूद, पंकज-निधि, रघवेंद्र राठोड, फाल्गुनी-शॉन पीकॉक, शांतनू-निखिल, विक्रम फडनीस, वेंड्रल रॉड्रीक्स आणि रॉकी हे नाव जुळले आहेत. 2003 पासून हा एक लोकप्रिय इव्हेंट झाला आहे.
बंगळुरुमध्ये आठव्यांदा फॅशन वीकचे आयोजन आहे. ही साथ कशी राहिली?
हा बंगळुरुचा एक प्रिमियम इव्हेंट आहे. फॅशन वीकमध्ये सहभागी झाल्यानंतर तरुण डिझायनर्सना आम्ही या क्षेत्रातील नामवंतांचा पाठिंबा मिळवून दिला आहे. आता हा बंगळुरुचा एक महत्त्वाचा इव्हेंट झाला आहे. लोकांना याची आतुरतेने प्रतिक्षा असते. आम्ही यासोबत जुळल्यानंतर खुष आहोत.
यावर्षीचे मुख्य आकर्षण काय आहे?
ब्लेंडर्स फॅशन वीक दरवर्षी मोठा आणि अधिक चांगला होत आहे. यावर्षी देशातील आघाडीची फॅशन डिझायनर रितू कुमार कलेक्शन सादर करणार आहे.
2013मध्ये ब्लेंडर्स प्राईडच्या काय योजना आहेत? यावर्षी आणखी काय विशेष राहणार आहे?
ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूरला या क्षेत्रातील दिग्गजांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. यावर्षी देशातील 6 शहरांमध्ये ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईटचे आयोजन करून फॅशन इव्हेंट्स घेणार आहोत. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी, मॉडेल्स तसेच अनेक डिझायनर्स सहभागी होणार आहेत.
फॅशन वीकच्या यशामागील त्रिसुत्री काय?
कोणत्याही फॅशन वीकमध्ये स्टाईल हा एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय डिझायनर्सची योग्य निवड आणि ट्रेंडसेटींग ड्रेसेस कोणत्याही फॅशन वीकला अविस्मरणीय बनवू शकतात.
ब्लेंडर्स प्राईड तरुण डिझायनर्सना कशा पद्धतीने सहकार्य करीत आहे?
ब्लेंडर्स प्राईडकडून तरुणांना तसेच भविष्यातील डिझायनर्सना पूर्ण सहकार्य देण्यात येत आहे. आम्ही आयोजनामध्ये त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.
फॅशन इंडस्ट्री आणि इव्हेंटला बॉलिवूडचे समर्थन किती आवश्यक आहे?
बॉलिवूड स्टार्स प्रत्येक फॅशन शोला ग्लॅमरस बनवितात. डिझायनर्सचीदेखील त्यांच्या ड्रेसेसला न्याय देण्याची गरज आहे. त्यामुळे ते फॅशन शोमध्ये वेगळे दिसतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.