आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदरनिर्वाहासाठी लग्नात गायचे गझल सम्राट, गीतकारांना द्यायचे नफ्यातील वाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात गझलचा उल्लेख होताच जे नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते नाव म्हणजे जगजित सिंग. गझल नवाज जगजित सिंग यांची आज 74 वी जयंती आहे. 8 फेब्रुवारी 1941 रोजी राजस्थानात श्रीगंगानगर येथे अमरसिंग धीमन आणि बचन कौर यांच्या पोटी जगजित यांचा जन्म झाला होता. चार बहिणी आणि दोन भावांसह राहणाऱ्या जगजित सिंग यांना घरी 'जीत' या टोपण नावाने बोलावत.
तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या जगजित सिंग यांनी हजारो गझला गायिल्या आणि अजरामर केल्या. जगजित सिंग यांचे 80 अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याने भारतात पहिल्यांदा रुजवली.
10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जगजित सिंग यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जगजित सिंग यांच्या आयुष्यातील अज्ञात गोष्टी...