दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी आज वयाच्या 64व्या वर्षात पदार्पण केले आहे.
रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांतचे चाहते आहेत. 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता.
रंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांत आज सर्वाधिक श्रीमंत फिल्म स्टार आहे. मात्र त्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. रजनीकांत यांनी आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पूरस्कारानेही सन्मानित केले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रजनीकांत यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असाव्यात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रजनीकांत यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी...