आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा बी टाऊनच्या सेलेब्सचा तुम्ही न पाहिलेला खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी टाऊनमध्ये सध्या सलमान आणि शाहरुख यांच्या मैत्रीची बरीच चर्चा रंगत आहे. आपल्यातील कटुता विसरुन हे दोन्ही स्टार्स सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. याशिवाय आता या दोघांमध्ये बोलचालही सुरु झाली आहे. बिग बॉस 7 आणि आपल्या सिनेमाच्या प्रमोशनवेळी सलमानने आवर्जुन शाहरुखचा उल्लेख केला.
अलीकडेच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुख आणि सलमानने एकमेकांना अलिंगन दिले होते. या सर्व घटनांवरुन पुन्हा एकदा या दोघांच्या जुन्या मैत्रीचे किस्से रंगू लागले आहेत. जुने रुसवे-फुगवे विसरुन हे दोघे पुन्हा एकदा मैत्री करण्यास इच्छूक दिसत आहेत. एकेकाळी सलमान आणि शाहरुख यांच्यात घनिष्ट मैत्री होती. एकमेकांच्या सिनेमात हे कॅमिओ रोलमध्ये दिसायचे. वरील छायाचित्र हे त्यांच्या मैत्रीचे एक उदाहण आहे. या दोघांचं हे छायाचित्र क्वचितच त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळालं असेल.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सची अशीच काही खास छायाचित्रे दाखवत आहोत, जी कदाचितच त्यांच्या चाहत्यांनी बघितली असावी.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा आपल्या आवडत्या स्टार्सच्या आयुष्यातील वेगवेगळे रंग...